कृषीपंप धारकांच्या 2300 कोटींपैकी 12 कोटी वसूल
सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर - सोलापूर जिल्ह्यातील लाख 43 हजार कृषीपंपधारकांकडेे असलेल्या 2300 कोटी थकबाकी पैकी पंधरा दिवसांत 12 कोटी 17 लाख रुपये वसूल झाले आहेत. राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकर्यांना वीज बिल भरण्यास शासनाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांची वीज खंडित होणार नाही.
30 ऑक्टोबरला थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकर्यांना नोव्हेंबरपर्यंतच थक बाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता चालू वीज बिल 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल. 30 नोव्हें बरपर्यंत शेतकर्यांचे वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही.
30 हजार रुपयांपर्यंत मूळ रकमेचे पाच हप्ते करण्यात आले असून, मुद्दल मूळ रकमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकर्यांनी भरायचे आहेत. ज्या शेतकर्यांना अजूनपर्यंत वीज बिल वितरीत करण्यात आले नाही. त्या शेतकर्यांना महावितरणने त्वरित वीज बिलाचे वाटप करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकर्यांनी घेतला तर शेतकर्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येईल. अनधिकृत वीज जोडण्याविरुध्द नियमानुसार कारवाई करावी. सदर योजनेतील इतर अटी शर्तींमध्ये अन्य कोणताही बदल नाही. कृषीपंपधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
