साखरेच्या दराबाबत द्विस्तरीय दरपद्धतीची गरज - काळे
अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - साखरेच्या वाढीव दराबद्दल व अवास्तव प्रचार, चिंता व टीका टिपणी करून साखरेचे दर नियंत्रित ठेवले जातात. पण त्यामुळे ऊस उत्पादक शेतक -यांचे नुकसान होते. त्यासाठी शासनाने साखरेचा दर हा घरगुती वापरासाठी एक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी वेगळा दर आकारून द्विस्तरीय दरपद्धती स्विकारावी, असे आवाहन क र्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व प्रमुख मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे होते.
कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी आ. अशोक काळे म्हणाले की, 2015 साली भयंकर दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची व पशुधन वाचविण्याची मोठी चिंता होती. त्यामुळे ऊस क्षेत्रात मोठी घट होऊन त्याचा विपरीत परिणाम साखर कारखान्याच्या 2016-17 च्या हंगामावर झाला. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले आहे. आपले व्यवस्थापन चांगले असल्यामुळे परतीच्या पावसात गोदावरीला अचानक पाणी सोडले तरीही आपले के. टी.वेअर सुरक्षित राहिले व पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यावर्षी आवर्तनाची परिस्थिती चांगली राहील त्यामुळे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, छबुराव आव्हाड, कारभारी जाधव, कारभारी आगवन, नारायण मांजरे, अनुसया होन, जी. जे. जगताप, जे. ए. भिडे, ए. व्ही. काळे, एस. एस. कोल्हे, बी. बी. सय्यद, बी. चव्हाण, के.व्ही. कापसे, एस. जे. ताकवणे, श्री. औताडे आदींसह सभासद, शेतकरी आदी उपस्थित होते.