स.पो. उपनिरीक्षकाची महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ
सातारा, दि. 05, नोव्हेंबर - फलटण तालुक्यातील जिंती येथील रहिवासी व शिरवळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप बाबासाहेब धुमाळ यांची गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली. पुणे याठिकाणी उपचारादरम्यान दिलीपराव धुमाळ यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये सातारा जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचा-यांना अपघातामध्ये मृत्यू झाल्याने सातारा जिल्हा पोलिस दलात शोकाकुल वातावरण आहे.
शिरवळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीपराव धुमाळ हे 24 सप्टेंबर रोजी भादे गावच्या हद्दीमध्ये असणा-या वीर धरण परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पेट्रोलिंग करताना वीर धरणावरून परतत असताना शिरवळ-लोणंद रस्त्यावरील माने कॉलनी, भोळी गावच्या हद्दीत दिलीपराव धुमाळ यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.
शिरवळ पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी दिलीपराव धुमाळ यांना तातडीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर सातारा येथील रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना 25 सप्टेंबर रोजी पुणे याठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून धुमाळ यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्यानंतर धुमाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिंती येथे नीरा नदीकाठी दिलीपराव धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धुमाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, सून, मुली असा परिवार आहे.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीपराव धुमाळ यांना मानवंदना देण्यात आली.