Breaking News

प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. कांकरिया यांना श्यामची आई पुरस्कार प्रदान

अहमदनगर, दि. 05, नोव्हेंबर - स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या व अहमदनगरमधील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांना श्यामची आई या मानाच्या पुरस्क ाराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील खोदड येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित एका शानदार समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते डॉ.सुधा कांकरिया यांना हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खोदड गांवचे सरपंच विजय गायकवाड व डोंगरे मामा यांनी स्वागत करताना डॉ.सुधा कांकरिया यांनी स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या माध्यमातून गेली 32 वर्षे केलेल्या क ार्याची माहिती दिली.डॉ.श्रीपाल सबनीस यांनीही सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव केला.
ते म्हणाले, डॉ.सुधा कांकरिया यांची चिमुकल्या जिवांना वाचविण्याची तळमळ कौतुकास्पद आहे.श्यामच्या आई प्रमाणे संस्कृतीचे जतन करीत त्यांनी सुसंस्काराचे चिंतन आपल्या  प्रत्यक्ष आयुष्यात केले आहे.ही गोष्ट निश्‍चितच अभिनंदनीय आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ.कांकरिया म्हणाल्या, श्यामची आई या पुरस्काराने आपणास आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.खोदड ग्रामपंचायतीने स्त्री जन्माचे  स्वागत करण्याचा ठराव मंजूर केला हा आपल्यासाठी खरच मोठा पुरस्कार आहे. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.