राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे
मुंबई, दि. 05, नोव्हेंबर - भाजप सरकारने ओबीसी समाजाला फक्त आश्वासनांची गाजरेच दाखवली असून सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.
ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.
त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आ र्थिक विकास महामंडळाला 4 हजार कोटी भागभांडवल द्या, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमिलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव द्या, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अंमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद, विधानसभा, लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण द्या, शेतकर्यांची फसवी क र्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.