राजापूरच्या शिवपुतळ्याचे बुधवारी अनावरण
रत्नागिरी, दि. 11, नोव्हेंबर - राजापूरच्या जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज वास्तूनिर्माण समितीचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांना दहशत बसावी, यासाठी ब्रिटिशांची राजापूरची वखार लुटली होती. शिवरायांच्या या पराक्रमाची आठवण म्हणून राजापूरच्या जवाहर चौकात भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. राजापूर नगरपालिका, शिवस्मारक जीर्णोद्धार समिती आणि शिवप्रेमींच्या पुढाकाराने पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून पाली दरवाजाही उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण येत्या बुधवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही धार्मिक विधीही केले जाणार असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले. दोन दिवस होणा-या या कार्यक्रमाचे समितीच्या वतीने नियोजन करण्यात येणार आहे.