Breaking News

मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, 3 जखमी

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर आज शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गहुंजे स्टेडियमजवळ ही घटना घडली आहे. इंडिगो ही चारचाकी मुंबईहून पुण्याला निघाली होती. दरम्यान, पहाटे 4.30 च्या सुमारास गहुंजे गावच्या हद्दित एका अज्ञात वाहनाने या चारचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत चारचाकीमधील 1 प्रवासी ठार तर 3 प्रवासी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने जखमींना सोमटणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.