क्रिप्स फाउंडेशनतर्फे 25 दृष्टिहीन जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
पुणे, दि. 04, नोव्हेंबर - क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच 25 दृष्टिहीन जोडप्यांच्या (दोघांनाही दृष्टी नसलेले) सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन येत्या रविवारी 5 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता नानूजी जय जिनेंद्र प्रतिष्ठान, गंगाधाम चौक याठिकाणी करण्यात आले असून यावेळी 300 हुन अधिक लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे. यावेळी सर्वधर्म संभव या संकल्पनेतून या मंगलमयी प्रसंगी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, आणि पारशीअसे पाच धर्माचे धर्मगुरू नवविवाहित जोडप्याना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित असणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून म्हणजेच अमरावती, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद , कल्याण आणि पुणे याठिकाणाहून ही 25 जोडपे या शुभमंगल प्रसंगी एकत्र आले आहेत. या जोडप्यांपैकी 4 जोडपी पुण्यातील असून एक आदिवासी भागातील आहे.