Breaking News

काँग्रेसच्यावतीने 8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णयाचे श्राध्द

सांगली, दि. 02, नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच मोडकळीस आली आहे. या निर्णयानंतर देशाचा विकासदर अवघ्या दोन  टक्क्यांवर आला असून हा संपूर्ण अर्थव्यवस्थेला जबर धक्का देणारा निर्णय ठरला आहे. या निर्णयास बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एक वर्षे पूर्ण होत असल्याने त्याचदिवशी का ँग्रेसच्यावतीने जुन्या नोटांचे श्राध्द घालून केंद्र शासनाच्या या अवसानघातकी निर्णयाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तथा आमदार प ृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. कर्जमाफीचे निकष ठरविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ- मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्र असा जाणीवपूर्वक भेदभाव करीत  असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जत तालुक्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त सांगली जिल्हा दौर्यावर आलेले पृथ्वीराज चव्हाण येथील शासकीय विश्रामगृहात आयो जित पत्रकार बैठकीत बोलत होते. या पत्रकार बैठकीस माजी आमदार हाफिज धत्तुरे हेही उपस्थित होते. या पत्रकार बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या गत  तीन वर्षातील केंद्र व राज्यातील कारभाराचे वाभाडे काढले.
केवळ कोणाच्या तरी अट्टाहासापोटी केंद्र शासनाने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसलेला आहे. या निर्णयामुळे गत वर्षभरात देशाच्या विकासाचा दर गतीने कमी होत चालला  आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या कालावधीत 9.2 टक्के इतका असलेला विकासाचा हा दर सध्या दोन टक्क्यावर आला आहे. देशाचे 86 टक्के चलन रद्द करून नवे चलन बाजारात  आणले गेले. हा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देणारा निर्णय ठरला आहे.
या निर्णयामुळे देशातील काळा पैसा मोठ्याप्रमाणात बाहेर येईल, असा ढोल वाजविला गेला. मात्र रोखीच्या स्वरूपातील हा काळा पैसा अत्यंत नगण्य असल्याने तसा कोणताही बदल  सामोरा आला नाही. वास्तविक, तज्ञांच्या मतानुसार या देशातील काळा पैसा हा सर्वाधिक जमिनी, बोगस कंपन्या व विदेशी बँका यातच गुंतविण्यात आलेला आहे. आता  भाजपमधीलच मोठी नेतेमंडळी या नोटाबंदी निर्णयामुळे ङ्गसगत झाल्याची कबुली देत आहेत. मात्र नरेंद्र मोदी ही गोष्ट काही कबूल करण्यास तयार नाहीत. त्यामुळे देशाची  अर्थव्यवस्था मोडकळीस आणणार्या या निर्णयाविरोधात काँग्रेसच्यावतीने दि. 8 नोव्हेंबर रोजी जुन्या नोटांचे श्राध्द घालून निषेध केला जाणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सां गितले.
कर्जमाफीचे निकष ठरविताना देवेंद्र फडवणीस विदर्भ- मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात भेदभाव करीत आहेत, असा थेट आरोप करून ते म्हणाले, की खरे तर दीड लाख रूपयाऐवजी  जादा अडीच ते तीन लाख रूपये कर्जमाफी द्यायला हवी होती. राज्य शासनाने राज्यातील 89 लाख शेतक-यांना 34 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र  त्यातील 13 लाख शेतक-यांची खातीच गायब झाली आहेत. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी संबंधित युनियन बँकेने कर्जमाफी दिलेल्या खात्यांची संख्या साडे  सहा लाखांवरून दीड लाख कशी झाली, याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
नोटाबंदी व वस्तू सेवा कर (जीएसटी) या निर्णयासह शेतकरी कर्जमाफीमुळे सर्वसामान्य जनता कमालीची हैराण झाली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून  भाजपकडून भ्रमनिरास झाल्याने देशातील वातावरण सध्या झपाट्याने बदलत चालले आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सात- बारा कोरा, स्वामीनाथन आयोगाची  अंमलबजावणी, उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक हमीभाव व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते. मात्र या वचनाची आता तीन वर्षे झाली तरी अद्यापही पूर्तता  झालेली नाही. या भाजप सरकारविरोधात कोणी बोलल्यास थेट त्याच्यावर विविध मार्गाने कारवाई केली जात आहे. त्याच्या विषयी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत.  एका नेत्यावर कारवाई झाली की बाकीची नेतेमंडळी आपसूक आपल्या दहशतीखाली येतील, हाच त्यामागे भाजपचा डाव आहे. सध्या देशात अत्यंत वाईट पध्दतीने राजकारण सुरू  आहे, अशी खंतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.