Breaking News

‘पंचवटी एक्सप्रेस’चा 43 वा वाढदिवस चाकरमान्याकडून साजरा

नाशिक, दि. 02, नोव्हेंबर - मुंबईला जाणारे नाशिकचे पर्यटक व विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ठरलेल्या पंचवटी एक्सप्रेसने 43 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त ‘पंचवटी’ला  आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी रेल परिषद, रेल्वे सल्लागार समिती व प्रवाशांच्या वतीने या गाडीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1 नोव्हेंबर 1975 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पंचवटीला हिरवा झेंडा दाखवत नाशिकच्या प्रवाशांची सोय केली होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सकाळी  खा. हेमंत गोडसे, आ. योगेश घोलप, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकने, नितीन चिडे, बिपीन गांधी आणि प्रवासी उपस्थित होते.
यावेळी केक कापून खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते रेल्वे चालक आणि तांत्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेचे मुख्य प्रबंधक सक्सेना उपस्थित होते. पंचवटी  एक्सप्रेसमध्ये नांदगाव येवला मनमाडच्या प्रवाशांना वेगळी बोगी देण्यात आली आहे. यात नाशिकसाठी वेगळी बोगी असून हजारो प्रवाशी दररोज मुंबई नाशिक मनमाड साठी प्रवास क रतात. मुंबईत जाण्यासाठी काही एसी बोगीची सोय या एक्सप्रेसमध्ये करण्यात आली आहे. चेयर कारदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. मासिक पासधारकांचा आकडा  मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ट्रेनने प्रवास करताना त्यांच्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळी जागा म्हणून स्वतंत्र बोगी  उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनेक महिलादेखील दररोज नाशिक-मुंबई प्रवास सुरक्षित प्रवास करत आहेत.