फेरीवाल्यांच्या मोर्चाला परवानगी न देण्याची मनसेची मागणी
नवी मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - फेरीवाला कारवाईला खीळ बसावी व अनधिकृत फेरीवाल्यांची युनियन काढणा-यांची हफ्तेबाजी सुरु राहावी यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी उद्या मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी तुर्भे वॉर्ड ऑफिसवर अनधिकृत फेरीवाल्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये. अशी मागणी नवी मुंबई मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सिडको आणि पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र एकाही अनधिकृत फेरीवाल्यावर व त्याला आश्रय देणा-यांवर फौजदारी व कायदेशीर गुन्हा नोंदविला नाही. म्हणून हे अनधिकृत फेरीवाले पुन्हा त्या जागेवर बसतात तर अनधिकृत फेरीवाल्यांवर मनपा पथकाची कारवाई होण्यागोदर हे अनधिकृत फेरीवाले उठतात, याचा अर्थ मनपा प्रशासनातील मंडळीच त्यांना याची माहिती देतात. अशी घटना या अगोदर बेलापूर वॉर्ड ऑफिस अंतर्गत घडलेली आहे. त्यावेळी मनपा आयुक्तांनी दोघांना निलंबितही केले होते. हे झारीतील शुक्राचार्य मनपा आयुक्तांनी शोधून काढावा असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच शाळा व हॉस्पिटल परिसराच्या 100 मीटरच्या परिसरात सीमा रेषा आखाव्यात व तेथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात यावी. मुळातच अनधिकृत फेरीवाला युनियनचा सभासद होतोच कसा ? युनियन त्याला सभासद करतात कशा ? अनधिकृत फेरीवाल्यांना आश्रय देणार्या या युनियनच्या नेत्यांवर कारवाई व्हावी, पोलिसांनी त्यांना नोटीसा बजवाव्यात. तसेच फेरीवाला धोरण नवी मुंबईत राबविल्यास त्यामध्ये मराठी स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी देखील मनसे तर्फे मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे.