एमपी मिल कंपाऊंड प्रकरण लोकायुक्तांचे प्रकाश मेहतांवर ताशेरे
मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कारभारावर लोकयुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांनी दिलेली नियमबाह्य परवानगी नाकारता आली असती असे निरीक्षण लोकायुक्तांनी त्यांच्या प्रथमदर्शनी अहवालात केले आहे.
तसेच मेहता यांनी विकासकाच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर केला का, याचा तपास व्ह्यायला हवा असे मतही लोकयुक्तांनी व्यक्त केले. एमपी मिल कंपाऊंडसह मुंबईतील एसआरए प्रकल्पांना प्रकाश मेहता यांनी मुंजरी दिली होती. या दिलेल्या मंजुर्या वादग्रस्त ठरल्या असून यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.