Breaking News

नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि.7 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने 18 ते 29 वयोगटातील युवक युवतींसाठी राष्ट्राच्या विकासाकरीता माझे योगदान या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात संपन्न होणार असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील युवक युवतींना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी केले आहे.

या स्पर्धेत युवक युवतींना हिंदी अथवा इंग्रजी भाषेत आपले विचार मांडता येणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 5 हजार रु., द्वितीय 3 हजार रु., तृतीय क्रमांकास 1 हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम विजेत्यास राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तरावर अनुक्रमे 25 हजार रु., 10 हजार रु., 5 हजार रु. तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, 1 लाख व 50 हजार रुपयाचे बक्षिस पीएफएमएस द्वारे देण्यात येणार आहे. 

तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले असून, प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत बुधवार दि.6 डिसेंबर पर्यंन्त आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयास दुरध्वनी क्र. (0241) 2470287 यावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.