अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुले हुशार, तल्लख - सचिन
युनिसेफ विश्व बालदिनानिमित्त त्यागराज स्टेडियममध्ये आयोजित एका कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सचिन तेंडुलकरने मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले, आजकालच्या तंत्रज्ञानामुळे मैदानावर काय चालले आहे हे तुम्हाला त्वरित कळू शकते.
तीन वर्षांचा मुलगाही संगणकासमोर बसून त्याला पाहिजे ती माहिती मिळवू शकतो किंवा गेम्स खेळू शकतो. तोच मुलगा मोबाइलवरून संदेश पाठवू शकतो किंवा कॉल लावू शकतो आणि गेम्सही डाऊनलोड करू शकतो. या आधुनिक मार्गांमुळे लहानवयातच मुले हुशार आणि चलाख होतात आणि त्यांना नवीन दृष्टिकोन मिळतो.
लहान मुले विशेष असल्यामुळे प्रत्येक दिवस हा बालदिन म्हणून साजरा व्हायला हवा. २० नोव्हेंबर हा खास दिवस आहे. या दिवशी लहान मुलांना पूर्ण स्वातंत्र्य असते आणि म्हणूनच हा दिवस त्यांच्यासाठी विशेष ठरतो
