कोहलीला आयसीसीकडून क्लीन चिट
नवी दिल्ली, दि. 03, नोव्हेंबर - दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर (बुधवारी) खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 53 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचं लक्ष आशिष नेहराच्या निवृत्तीकडेच होतं. मात्र, याचदरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली डगआऊटमधून वॉकी-टॉकीवर बोलत असल्याचं दिसून आलं.
टीव्हीवर हे दृश्य दाखवताच अनेकांनी त्याच्या या कृतीवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. पण याप्रकरणी कोहलीला आयसीसीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. ‘मॅचदरम्यान वॉकी-टॉकीचा वापर हा टीम स्टाफ आणि ड्रेसिंग रुममध्ये संपर्कासाठी केला जातो. कोहलीनं आधीच भष्ट्राचारविरोधी पथकाची परवानगी घेऊन वॉकी-टॉकीचा वापर के ला होता.’ अशी माहिती आयसीसीच्या अधिकार्यानं दिली.