देशभरातील शेतकर्यांचा एल्गार 162 संघटनांचेे दोन दिवशीय आंदोलन राजधानीत सुरू
नवी दिल्ली : देशभरातील शेतकर्यांचा असंतोष पुन्हा उफाळून आला असून, सोमवारी देशभरातील शेतकरी मोदीसरकारविरोधात राजधानीत एकवटले आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांना हमीभावाचे आश्वासन देणार्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकरी एकवटला आहे. शेतमालाचा हमीभाव, कर्जमुक्ती, शेतीचं धोरण, शाश्वत शेतीची खात्री, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत मोर्चा काढणार आहेत.
या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील 162 शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. सुमारे दहा लाख शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या (एआयकेएससीसी) अध्यक्षतेखाली देशातील शेतकरी या दोन दिवसीय आंदोलनात सहभागी झाले आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीने हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन काढण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने 10 जुलैला जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सरकारी घोळ अजून संपला नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. कर्जमाफीसाठी 22 सप्टेंबरपर्यंत 56 लाख 59 हजार 178 शेतकर्यांनी संपूर्ण माहितीसह ऑनलाइन अर्ज सरकारकडे सादर केले.
त्यानंतर, लेखापरीक्षकांनी बँकांमध्ये जाऊन या अर्जांची पडताळणी केली. लेखापरीक्षकांनी काढलेल्या त्रुटी दूर करून, अद्ययावत याद्या अपलोड करण्यात आल्या, पण त्यानंतर रोज सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि नवीन माहितीमुळे याद्या अपलोडच्या कामास विलंब लागत असून, आजही हे काम पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीची योजना जाहीर होऊन चार महिने झाले, तरी अद्याप याद्यांचा घोळ संपलेला नाही. त्यामुळे कर्जमाफीही पूर्णत: झालेली नाही. त्यामुळे आता शेतकर्यांच्या आंदोलनानंतर तरी सरकार शेतकरी प्रश्नावर तोडगा काढते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या
शेतीमालाल हमीभाव द्या संपूर्ण कर्जमुक्ती शाश्वत शेतीची खात्री स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावी
