Breaking News

वकील अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई, दि. 13, नोव्हेंबर - नेरुळमधील स्वप्निल सोनावणे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख वकील अमित कटारनवरे यांच्यावर आज धारदार शस्त्रांनी हल्ला कऱण्यात आला. त्यांच्या डोक्यात, पोटात आणि पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही अमित कटारनवरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.


जुलै 2016 मध्ये नेरुळ येथे प्रेमप्रकरणातून स्वप्निल सोनावणे 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या घरच्यांना दोघांची मैत्री मान्य नसल्याने कुटुंबियांनी स्वप्निलला घरी बोलवून मारहाण केली होती. यात स्वप्निल जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.