Breaking News

दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून दोघांवर वार

पुणे, दि. 27, नोव्हेंबर - दारु पिण्यास पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून दोघांनी इतर दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार केले आहेत. ओमकार बाळू सरोदे व सागर खळगे (दोघे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनिल नागनाथ बनपट्टे (वय 28, रा. ओंकार कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ सचिन बनपट्टे याला दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र सचिनने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने संगनमताने सचिन याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. यावेळी फिर्यादी सचिन यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही आरोपींनी वार केले. यामध्ये सचिनच्या डाव्या क ानाच्या वर तर फिर्यादीच्या हातावर वार करण्यात आले आहेत. तसेच या भांडणात इतर इसमांनाही आरोपीने जखमी केले आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.