Breaking News

श्रीशांतवरील बंदी हायकोर्टाकडून कायम

तिरुवअनंतपुरम, दि. 18, ऑक्टोबर - स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी केरळ हायकोर्टाने कायम ठेवली आहे.  बीसीसीआयने केलेल्या याचिकेवर केरळ हायकोर्टाने हा निर्णय दिला.
श्रीसंतवर आजीवन बंदी त्याच्याविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर घालण्यात आली आहे. त्यामुळे कोर्ट बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीच्या निर्णयाची न्यायिक  समीक्षा करु शकत नाही, असं म्हणत श्रीसंतवरील बंदी कोर्टाने कायम ठेवली. कोर्टाच्या या निर्णयामुळे, श्रीसंतला रणजी ट्रॉफीतील आगामी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. शिवाय  बीसीसीआय आणि राज्य संघांच्या कोणत्याही सराव सत्रात त्याला सहभाग घेता येणार नाही. श्रीसंतकडे आता केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय उरला असून तो सुप्रीम कोर्टात जाणार  असल्याची माहिती आहे.