Breaking News

कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हाभर प्रवाशांची गैरसोय

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल; माळीवाडा,पुणे, तारकपुर स्थानकांवर शुकशुकाट

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - एस.टी. कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत प्रश्‍नांसाठी महाराष्ट्र एस.टी. वर्क र्स काँग्रेस (इंटक) व इतर मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामध्ये कामगार उत्सफुर्त सहभागी झाल्याने बस स्थानक एस.टी. विना ओस  पडले होते. तर ऐन सणासुदीच्या काळात पुकारण्यात आलेल्या संपाचा फटका प्रवाश्यांना बसला. बसस्थानकावर प्रवाशी बसच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे होते. एस.टी. चा पर्याय  उपलब्ध नसल्याने गावी जाण्यासाठी खाजगी गाड्या भरभरून प्रवाश्यांची वाहतुक चालू होती.
सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह  इतर मागण्यासाठी मंगळवारी रात्री एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला  आहे. मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले.  त्यामुळे दिवाळीला गावाकडे जाणारे प्रवाशी मध्यरात्रीपासूनच बसस्थानकावर अडकून पडले आहेत. दरम्यान, भल्या सकाळी एटीबसमधून दुध व भाजीपाला वाहतुक करण्यात येणारी  सेवा एक प्रकारे ठप्प झाली  असल्याचे चित्र होते. नोकरदार, कामगार व विद्यार्थ्यांची संपामुळे मोठी गैरसोय झाली आहे.
 एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, क ामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी या मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप सुरू केला आहे. ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांनी संप केल्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका  बसला आहे. नगरमध्ये संपात इंटक आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह चार संघटनांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात चार  हजार तीनशे कर्मचारी आहेत. जिल्ह्यात अकरा  डेपो असून साडे सातशे बस धावतात. साधारणपणे एका दिवसाला दोन हजार फेर्‍यां करतात. एका दिवसाला 55 ते 70 लाखापर्यंत उत्पन्न जातं. मात्र एसटी वाहतूक ठप्प झाल्याने  एसटीचं उत्पन्न बुडणार असून ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले