Breaking News

फेरमतमोजणीनंतर अंजनडोहच्या सरपंचपदी कमल आडे विजयी

बीड, दि. 19, ऑक्टोबर - धारूर तालुक्यातील अंजनडोह ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची फेर मतमोजणी येथील तहसील कार्यालयात आज दुपारी दोन्ही उमेदवारांच्या सक्षम क रण्यात आली. 9ऑक्टोबर रोजी मतमोजणी तहसील कार्यालयात करण्यात आली होती .सरपंच पदाच्या उमेदवार कमल युवराज आडे या विजयी झाल्या होत्या .परंतु अंजनडोह  ग्रामपंचायती चे निवडणुक निर्णयअधिकारी माने यांनी चुकीने पराभूत उमेदवारांच्या पुढे 156 येवजी 256 एवढा आकडा लिहिण्यात आले यामुळे वैशाली कांबळे यांची नोंद विजयी  उमेदवार म्हणून करण्यात आली . तशी माहितीही जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आली. यामुळे दोन्ही गटाचे उमेदवारानी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकार्‍यांच्या दालनांत  झालेल्या सुनावणीत हा सर्व प्रकार चुकीने झाला असल्याचे लक्षात आले. या बाबत तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी निवडणुक आयोगाकडून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन  मागवीले असता दोन्ही उमेदवारा समक्ष फेर मतमोजणी घेण्याचे निर्देश निवडणुक आयोगाकडून देण्यात आले होते त्यामुळे आज फेर मतमोजणी तहसील कार्यालय या ठिकाणी  घेण्यात आली त्यात सौ.कमल युवराज आडे या विजयी झाल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी घोषित केले.