Breaking News

माजलगाव बसस्थानकात परिवहन मंत्र्यांची अंत्ययात्रा काढल्याने चर्चा

बीड, दि. 19, ऑक्टोबर - ऐन दिवाळीमध्ये विवीध मागण्यांसाठी संपावर असलेल्या कर्मचार-यांनी माजलगांव बसस्थानक परिसरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची अंत्ययात्रा  काढली. दिवाकर रावते हाय हाय हाय अशा घोषणा या वेळी कर्मचार्‍यांनी दिल्या . सातवा वेतन आयोग लागु करण्याबाबत कोणतेही आश्‍वासन न मिळाल्याने तसेच पदनिहाय  वेतनश्रेणी द्यावी, वेतन वाढ द्यावी, कनिष्ठ वेतनश्रेणी लागु करावी, जुलै 2016 पासुन वाढीव 7 टक्के महागाई भत्ता व जानेवारी 2017 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्याची थकबाक ी तात्काळ देण्यात यावी यासह विवीध 24 मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनांनी ऐन दिवाळीतच कालपासुन बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये सहभागी होत येथील  आगारातील कर्मचा-यांनी काल एकही बस आगाराच्या बाहेर येउ दिली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत तर खासगी वाहतुकदारांची मात्र तिपटीने पैसे घेउन  दिवाळी गोड करत आहे .असे असतांना परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी आणखी 25 वर्षे एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु होणार नाही असे वक्तव्य केल्याने एसटी  कर्मचारी आक्रमक झाले. कर्मचा-यांनी गाढवावर रावते यांची प्रतिमा लावुन धिंड काढली . बसस्थनकाच्या परिसरात फेरी मारून स्थानकाच्या बाहेर ही प्रेतयात्रा आणुन या ठिकाणी  दिवाकर रावते यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही कर्मचा-यांनी घोषणा  देत संताप व्यक्त केला.