प्रो कबड्डी : दंबग दिल्लीची पराभवाची मालिका खंडित
जयपूर, दि. 03 - गेल्या मोसमापासून सलग 11 सामन्यापासून विजय न मिळविणार्या दंबग दिल्लीने अखेर प्रो कबड्डी लीगमध्ये विजय साकार केला. इराणच्या मेराज शेखच्या चढाया तर, सचिन शिंगाडे व डी. गोपू यांनी बचावामध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये दबंग दिल्ली संघाने बंगळुरु बुल्स संघाचा 8 गुणांनी पराभव केला.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमध्ये अखेरच्या दिवशी पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये पहिल्या सत्रामध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. गुणांचे खाते जरी बंगळूरु बुल्स संघाने उघडले असले तरी नंतर दबंग दिल्लीने जोरदार पुनरागमन करत आपली चमक दाखवली. सामन्याच्या 12 व्या मिनिटाला सामना 5-5 असा बरोबरीत होता. यानंतर दबंग दिल्ली संघाच्या सचिन शिंगाडेने बचावामध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे 14 व्या मिनिटाला बंगळुरू बुल्सवर पहिला लोण चढवत 11-6 अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत आपला हाच फॉर्म कायम ठेवत दबंग दिल्ली संघाने 13-9 अशी आघाडी घेतली होती.
दुसर्या सत्रामध्ये दबंग दिल्ली संघाने आपला फॉर्म कायम ठेवला. मेराज शेखने एकूण आठ गुणांची कमाई करत संघाच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली. डी.गोपूने दोन सुपरटॅकल करत विजयामध्ये हातभार लावला. सामन्याच्या 38 व्या मिनिटाला त्यांनी दुसरा लोण चढवित संघाला 30-20 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.
बंगळूरु बुल्सने पुनरागमनाचे प्रयत्न केले. तरीही दिल्लीने आपली आघाडी कायम ठेवत 32-24 असा विजय मिळवला. बंगळुरु बुल्सकडून रोहित कुमारने चढाईत व मोहित छिल्लरने बचावात चमक दाखवली पण, संघाचा पराभव त्यांना टाळता आला नाही.