Breaking News

श्रेय कोणीही घ्या; पण उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा

। सर्वांनीबरोबर येऊन काम केले तर निश्‍चितच काम पूर्णत्वाकडे नेता येईल - सत्यजित तांबे 

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेला उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शनिवार दि. 14 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती भाजपा खासदार  दिलीप गांधी यांनी दिली होती. मात्र या उड्डाणपुलाची प्रक्रिया अगदी पहिल्या टप्प्यात आहे. श्रेयासाठी भाजप नेत्यांनी चालविलेली खटाटोप असून नगरकरांसाठी अस्मिता  उड्डाणपूलाचा कामाचा सध्याच्या सध्याच्या सरकारने पूर्णताह खेळ चालविला आहे. कामाचे श्रेय कोणही घ्या. परंतु काम सर्वांनी बरोबर येऊन पूर्ण करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश  युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
पुढे बोलताना तांबे म्हणाले की, नगरच्या विकासासाठी हा उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरवा केला आहे. प्रसिद्धीपेक्षा काम होणे आपल्या  दृष्टीने महत्त्वाचे आहे. यासाठी पत्रव्यवहार पाठपुरावा, भेटीगाठी घेतल्या आहेत. मात्र भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कुठे कार्यक्रम नाही आणि कुठेही भूमीपुजन नाही म्हणजे हा फक्त प्रसिद्धी व श्रेय घेण्यासाठी के लेला पोरकटपणा आहे. वस्तुस्थिती, अशी आहे या उड्डाणाणपुलााचे कामाची प्रक्रिया पहिल्या टप्पयात आहे. यासाठी डीटीआर रिर्पोट आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या क ामाची कोणतेही वर्कऑर्डर नाही. खरे तर शासनाच्या नव्या नियमानुसार काम पूर्ण झाले असल्याचा दाखला असल्या शिवाय उद्घाटन ही करता येत नाही. तूर्त सत्तेचे पद नसतानाही  आपण नगरकरांसाठी उड्डाणपूलाचे काम मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले, या कामासाठी राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांनी बरोबर येऊन हे काम पूर्णत्वाकडे कसे नेता  येईल, यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कामाचा खेळखंडोबा नको
सध्या उड्डाणपूलाच्या भूमिपुजन आणि कामावर नगरकरांचा विश्‍वास राहिला नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे हीच आमची इच्छा आहे. यासाठी जे काही प्रयत्न  करायचे आहे ते आम्ही करणार आहे. मात्र सर्वांनी बरोबर आले तर प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लागेल असाच विश्‍वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.