Breaking News

मावा बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - अन्न व औषध प्रशासन विभागाने स्थानिक पोलीसांच्या सहकार्याने शहरातील नाईकवाडी मोहल्ला भागात सय्यद ( पुर्ण नाव माहित नाही ) यांच्या  मावा बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून सुमारे 1 लाख 36 हजार 600 रुपयांचे मावा बनविण्याचे साहीत्य जप्त केले आहे. या प्रकरणी कारखान्यातील दिपक शिरसाठ व शक ील अहमद या दोन कामगारांना ताब्यात घेतले आहे.
शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला लेखी पत्र देवून येथे सुरु असलेल्या मावा काराखाना व विक्री करणा-या टप-यांवर कारवाई क रावी अशी विनंती केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपअधिक्षक बी.एम ठाकुर यांच्या पथकाने या कारखान्यावर पोलीसांना बरोबर घेवून छापा टाकला. यावेळी  मावा बनवणारांनी ब-याच वेळ त्यांना थांबून धरले होते. मात्र पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच सगळे तरुण पळाले. त्यानंतर कारखान्यात जावुन सुगंधी तंबाखु, सुपारी, लाक डाचा भुस्सा, विविध रंग असा 1 लाख 36 हजार 600 रुपयांचा माल हस्तगत केला.
याबाबत अन्न व सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत संबंधीतावर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे उपअधिक्षक ठाकुर यांनी सांगितले. तर शहर व तालुक्यात सर्रास  मावा विक्री करणा-या टप-यांवर धाड टाकून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी अन्न व औषध प्रसासनाकडे केली आहे. त्यासाठी  बंदोबस्त देण्याची तयारी ही त्यांनी दर्शविली. या पथकामध्ये उपअधिक्षक ठाकुर, शरद पवार, पी.एस. पाटील. आर.डी. पवार, के.एच. बाविस्कर यांच्यासह स्थानिक पोलीस निरीक्षक  सुरेश सपकाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन मगर, राजू चव्हाण, राजू नरवडे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.  शहर व तालुक्यात मोठया प्रमाणात मावा विकला  जातो. मागील महिन्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचा-यांनी या काराखान्यावर धाड टाकली होती. परंतू तडजोडी नंतर हे प्रकरण त्यावेळी मिटले गेले. मात्र माध्यमातून  याबाबत आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी सुरु केली  आहे.