Breaking News

कै.बाळासोब देशपांडे रुग्णालयाचे लवकरच ‘रुपडे पालटणार’ - महापौर

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - शहरातील कै. बा. देशपांडे रुग्णालयाचे रुपडे आता बदलणार आहे. प्रसुतीगृहातील सेवेचे विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने नविन इमारत बांधक ामासाठी शानाकडून निधी उपलब्ध झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोर गरिब व गरजू मातांना प्रसुतीसेवा अत्यंत अल्प दरात देत असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी म्हंटले  आहे.
यावेळी आयुक्त घनश्याम मंगळे, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, माजी सभापती सचिन जाधव, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, महिला व बालकल्याणच्या सभापती  सारिका भुतकर, नगरसेवक दिलीप सातपुते, मुदस्सर शेख, दत्ता मुदगल, हनुमंत भुतकर, किसनराव भिंगारदिवे, संतोष घोंगडे, शहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के, आरोग्यअधिकारी डा ॅ.अनिल बोरगे, उपशहर अभियंता आर.जी.सातपुते, वैद्यकिय अधिकारी डॉ.शिल्पा पाठक, आस्थापना प्रमूख लहारे आदी उपस्थित होते.
या रुग्णालयात सध्या रुग्णांची वाढ होत असून त्यामुळे सध्याच्या खाटा व जागा अपुर्‍या पडत आहेत. यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवजात शिशु व बालकांची उपचार  सुविधा सुरु करणे अद्यावत 200 खाटांचे प्रसुतीगृह, 20 लेबर बेड सह 3 ऑपरेशन थिएटर, 10 बेड चा आसीयू विभाग प्रसुती रुग्णांसाठी , नवजात शिशु व बालकांच्या  उपचारासाठी 30 बेड अंतररुग्ण विभाग, 10 बेड बालक उपचार अतिदक्षता विभाग स्थापन करणे, सदरची इमारत ही 55 ते 60 वर्षापासूनची असून अधिक काळ झाल्यामुळे या  इमारतीची दुरावस्था झालेली आहे. सध्या तात्पुरती किरकोळ डागडुगी करुन सेवा चालू आहे. प्रथम 12 हजार स्वे.फुट जागेमध्ये वरील सर्व कामे करण्यात येणार असल्याची माहिती  पत्रकाव्दारे महापौर सुरेखा कदम यांनी दिली आहे.
पुढे  बोलतना आयुक्त म्हणाले की, सदरच्या रुग्णालयास निधी उपलब्ध झाला असुन पहिल्या टप्प्यात काम लवकच सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांना प्रभावीपणे उपचार व न विन अद्यावत इमारत उभारुन कसा उपयोग होईल यासाठी पॅनलवरील आर्किटेक्ट यांनी सहाय्यक संचालक, नगररचना विभाग यांच्या समवेत लवकच बैठक घेणार आहे.
माजी सभापती सचिन जाधव जाधव म्हणाले की इमारतीचे काम तात्काळ सुरु करावे व लवकर पुर्ण करावे.