Breaking News

ब्रेक फेल झालेल्या एसटीने दिली सहा वाहनांना धडक; दोन ठार

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - आज सांयकाळी,ऐन दिवळीच्या आदल्या दिवशी एसटी बसने एक दुचाकी, चार रिक्षा आणि कारला धडक दिल्याने दोघे ठार झाले तर दोघेजण  गंभीर जखमी झाले. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा कंट्रेाल सुटुन बेभान वेगाने जाणार्या बसने अक्षरशहा या वाहनांना फरफटत नेले. बघणार्यांच्या अंगावर थरकाप  उडवणारा अपघात सीडको बसस्टँड ते वसंतराव नाईक रस्त्यावर घडला.
आज सोमवारी सायंकाळी एस.टी. बस क्रमांक (एमएच-40एन 9768)सिडको बसस्थानकातून प्रवाशी घेऊन बीडला निघाली. वसंतराव नाईक चौकातून जात असताना बसचे ब्रेक  फेल झाला त्यामुळे चालकाला बसवर नियंत्रण करता येन नव्हते सुरूवातीला बसने दुचाकीस्वाराला उडवले, यानंतर एकापाठोपाठ चार रिक्षा आणि ड्रायव्हींग स्कुलच्या कारला धडक  दिली .दोन रिक्षा उडून खांबाला धडकून पडल्या तर एक रिक्षा बसच्या पुढच्या बाजुस अडकून फरफटत गेली. या घटनेत दोघे बाईकस्वार ठार झाले अमित पाटील व डॉ. हरिकिशन  पाटील अशी त्यांची नावे असून दिवाळीनिम्मित्त ते गावी जात होते. या पषकी एकाचा बसच्या चाकाखाली अडकून जागीच मृत्यू झाला. त्याचा मेंदू बसखाली चिरडला होता.दुसराही  खाली पडून मरण पावला अन्य दोघे गंभीर जखमी झाले. बसचालक पसार झाला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.