Breaking News

कर्जमाफीचा पहिला हप्ता थेट शेतक-यांच्या खात्यात - मुख्यमंत्री

जालना, दि. 17, ऑक्टोबर - शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस या दिवाळीपासून दि. 18 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून कर्जमाफीचा पहिला हप्ता थेट शेतकर्यांच्या  खात्यात शासन जमा करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जालना तालुक्यातील कडवंची या गावात सिमेंट नाला बंधार्याची पाहणी व जलपूजन त्यांच्या हस्ते  झाले. यावेळी उपस्थित शेतकर्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष व खा. रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर,  राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जों धळे, जि. प. मुख्याधिकारी दीपक चौधरी, सरपंच चंद्रकांत क्षीरसागर आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की शासकीय योजनांचे यश हे त्यामधील लोकसहभागावरच अवलंबून असते. कडवंची गावाने याचे उदाहरण कृतीतून घालून दिले आहे. शेतक र्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. या कार्यक्रमास पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध स्तरातील  पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.