Breaking News

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी 75 टक्के मतदान

सांगली, दि. 17, ऑक्टोबर - सांगली जिल्ह्यातील 424 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मोठ्या उत्साहात सरासरी 75 टक्के इतके चुरशीने मतदान झाले. वाळवा तालुक्यातील वाटेगाव  व कडेगाव तालुक्यातील कमळापूर या दोन ठिकाणी हाणामारी व वादावादीचा प्रकार घडला. वाटेगाव येथील मतदान केंद्राबाहेर दगडङ्गेकीची घटना घडल्याने काहीकाळ मतदान प्र क्रिया थांबविण्यात आली होती. या दगडङ्गेकीत तीनजण जखमी झाले. उद्या मंगळवार दि. 17 ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 38, तासगाव- 26, कवठेमहांकाळ- 29, वाळवा- 88, शिराळा- 60, खानापूर- 46, आटपाडी- 26, कडेगाव- 43, पलूस- 16, तर  जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे सरपंच- सदस्य पदासाठी रिंगणात उतरलेल्या दहा हजार 59 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात  बंद झाले.
ही मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाच्यावतीने 346 निवडणूक निर्णय अधिकारी, दोन हजार 148 केंद्र अध्यक्ष, दोन हजार 148 मतदान अ धिकारी (वर्ग एक), दोन हजार 148 मतदान अधिकारी (वर्ग दोन), तर दोन हजार 148 शिपाई यांनी विशेष परिश्रम घेतले, तर ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सात  पोलिस उपअधिक्षक, 15 पोलिस निरीक्षक, 102 सहाय्यक पोलिस निरीक्षक- पोलिस उपनिरीक्षक, एक हजार 777 पोलिस शिपाई व एक हजार गृहरक्षक दलाचे जवान असा पो लिस बंदोबस्त तैनात होता.
सोमवारी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, तासगाव, वाळवा व खानापूर या पाच तालुक्यात सरासरी 41 टक्के, तर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,  पलूस व मिरज या पाच तालुक्यात सरासरी 36 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांच्याकडून सांगण्यात आले. गाव पातळीवरील राजकारणात वर्चस्व ठेवण्यासाठी  सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस होती. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर महिला व युवकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्यात युवावर्गाचा मोठा उत्साह दिसून  आला.
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटात राडा झाला. वाटेगाव ग्रामपंचायतीसाठी वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र बर्डे व प्रकाश पाटील यांच्या  गटात काट्याची लढत होत आहे. दुपारच्या सुमारास वाटेगाव येथील मतदान केंद्रावर या दोन गटातील काही कार्यकर्त्यात वाद झाला व त्याचे पर्यावसान दगडङ्गेकीत झाले. त्यात  तीनजण जखमी झाले आहेत. या जखमींची नावे काही समजू शकली नाहीत. या घटनेमुळे काहीकाळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र राखीव पोलिस दलाची तुकडी  दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. कडेगाव तालुक्यातील कमळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यात जोरदार वादावादी झाली. मात्र  कडेगाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.