Breaking News

आमची फलंदाजी चांगली झाली नाही : कोहली

गुवाहटी, दि. 11, ऑक्टोबर - दुसर्‍या टी-20 सामन्यातील पराभवाला कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजांना जबाबदार धरल आहे. या   सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला.
‘मला वाटत नाही की, आमची फलंदाजी चांगली होती. सुरुवातीला आम्ही थोडं अडखळलो. त्यांनाही सुरुवातीला फलंदाजी करताना त्रास  झाला. पण दव पडल्यानंतर त्यांनी सामना आमच्या हातून खेचून घेतला. जेव्हा परिस्थिती तुमच्यासोबत नसते त्यावेळी मैदानावर तुम्हाला  120 टक्के कामगिरी करावी लागते. हाच अ‍ॅट्यिट्यूड महत्त्वाचा आहे आणि टीम देखील हेच करण्याचा प्रयत्न करते.’ असं कोहली  सामन्यानंतर म्हणाला.