Breaking News

वॉर्ड क्र. 116मध्ये पोटनिवडणूक, सेना-भाजपत चुरशीची लढत

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - मुंबईतील प्रभाग क्र. 116मध्ये (भांडुप पश्‍चिम) काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या  निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आज (बुधवार) पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
या निवडणुकीत आपणच बाजी मारावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रभागामध्ये चांगलाच जम बसवला आहे. तर शिवसेनेचे आमदार अशोक  पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच प्रमिला पाटील यांचं निधन  झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
ही लढत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली असून या पोटनिवडणुकीनंतर आकड्यांचं गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे  इथं विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.