अश्विनने चाहत्यांना फटकारलं
गुवाहटी, दि. 11, ऑक्टोबर - ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर काल रात्री उशिरा दगडफेक झाली. अज्ञाताने सामना संपल्यानंतर हॉटेलकडे जाणार्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचने याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक केल्यामुळे टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपण अशा देशात राहतो, ज्याची संस्कृती ‘अतिथि देवो भव’ आहे, असं अश्विनने म्हटलं आहे. दुसर्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. त्यावेळी बसवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बसची काच फुटली.