Breaking News

डॉ.मंजुश्री खोब्रागडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - स्व.श्रावण  बावस्कर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ लायन्स क्लब खामगाव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 2017 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बुलडाणा पंचायत समितीत कार्यरत असलेल्या साहित्यिक डॉ.मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 1 ऑक्टोबर रोजी कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते खामगाव येथील नगर परिषद लायन्स आय हॉस्पीटल सेल्स टॅक्स ऑफीस समोर नांदुरा रोड येथील कार्यक्रमात देण्यात आला. 
या कार्यक्रमाला  कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आ.अ‍ॅड.आकाश फुंडकर, एम.जे.एफ.लॉ. संदीप मालू, उपविभागीय अधिकारी  मुकेश चव्हाण, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, लॉ.अशोक केला आदींची  प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  लॉ.उज्वल गोयनका, लॉ.डॉ.अशोक  बावस्कर, लॉ.अभय अग्रवाल आदींसह लायन्सच्या क्लब खामगाव व धन्वंतरी चॅरिटेबल मेडिकल फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. तर मी करत असलेल्या कामाची पावती मला या पुरस्काराच्या रुपाने मिळाल्याची भावना डॉ.मंजुश्री खोब्र्रागडे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच यापुढेही आपण विद्यार्थ्यांसाठी व समाजहितासाठी सतत समाजशील उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
x