Breaking News

स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात कणखर बनावे : प्रा. सदानंद देशमुख

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - आधुनिकीकरणाच्या युगात ग्रामीण भागातील स्त्रीयांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे येवून कणखर बनले पाहिजे, असे मत साहित्य अगादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा.सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले. दि. 29 सप्टेंबर रोजी स्थानिक नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ, शिवाजी नगर जानेफळच्या वतीने आयोजित भव्य गरबा स्पर्धा व प्रा.सदानंद देशमुा यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून सत्कार स्वीकारताना त्यांनी आपले मनोगत मांडले. 
शिवाजीनगर जानेफळ येथील नवदुर्गा मंडळाने स्त्रीयांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे प्रा.सदानंद देशमुख यांनी तोंडभरुन कौतूक केले. विविध खेळांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून या मंडळाने सातत्याने स्त्री शक्तीचा अविष्कार प्रकट केला आहे. त्यातच प्रा.सदानंद देशमुख यांच्या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. सोबतच भव्य गरबा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या परिक्षणाचे काम सौ.फिरके मॅडम, सौ.छापरवाल मॅडम, सौ.देशमुख मॅडम, गुजरे मॅडम व सौ.पडधरिया यांनी पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रा.देशमुख यांच्या हस्ते भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी कृतिशील शिक्षक पुरुषोत्तम शिंदे यांच्या बहरदार सुत्रसंचलनाने गरबा स्पर्धेत रंगत आणली. या प्रसंगी पत्रकार गणेश सवडतकर, संदीप दांडगे, संदीप देशमुख, योगेश क्षीरसागर, राज पडधरीया, बाळू पडधरीया, अशोक जाधव, विनोद सवडतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयचंद, प्रदिप कानकराव, वैभव नवले, पंकज डव्हळे, शेख असलम, भोला येवले आदींसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते व गावातील महिला व पुरुष नागरिकांनी परिश्रम घेतले.