Breaking News

सम्राट एकलव्य जयंती आणि बळी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शेख

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - शहरातील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांचे वतीने गेल्या सात वर्षांपासून सम्राट एकलव्य जयंती व बळी महोत्सव साजरा करण्यात येतो,  यावर्षीच्या समितीच्या  अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राजुभाई शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अशी माहिती समितीचे  निमंत्रक माजी विरोधीपक्ष नेते  कॉ. ब हिरनाथ वाकळे यांनी दिली. 
सम्राट एकलव्य व शेतकर्‍यांचा राजा बळीराजा यांची पारंपरिक भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शिवकालिन कला व लाठी-काठी मर्दानी  खेळ चौका चौकात होणार आहेत.
ही मिरवणूक चौथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू होणार असून राष्ट्रपिता म. फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व प्रमुख पाहुण्यांच्या  वैचारिक भाषणाने  समाप्त होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजु शेख यांच्या आजपर्यंत दिलेले सामाजिक योगदान लक्षात घेऊन 2017चे महोत्सव समितीचे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी आसिफखान दुलेखन, कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रा. कॉ. महेबूब सय्यद, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष अभिजित वाघ, प्रा.बापू चंदनशिवे, माजी अध्यक्ष संदीप  पवार, रोहित वाळके,  शेतकरी संघटनेचे सतीश निमसे, तारिक शेख, तिरमलेश पासकंटी, आदी मान्यवर उपस्थित होते.