Breaking News

बबनराव लोणीकर यांच्यावर जेथलिया यांचे बेफाम आरोप

जालना, दि. 18, ऑक्टोबर - पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी के ल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती  गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. इंग्लडस्थित भारतीयाचा मलबारहिल येथील बंगला खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी क रण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचे जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जेथलिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तीन वर्षांत  लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्राने कार्यकर्त्यांच्या नावावर जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली असल्याचा आरोप थेथ लिया यांनी केला. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाजयांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगल्या अधिकाजयांना  काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली. लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून याविरोधात  आवाज उठविणाजयास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. मतदारसंघात होत  असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांना त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशापोटी ते खोटे आरोप करत असल्याची प्रति क्रिया बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.