Breaking News

संजय उवाच............!

दि. 18, ऑक्टोबर - महाभारतात संजय उवाच..या दोन शब्दांना अनन्य साधारण महत्तम घटकाचे स्थान आहे.महाभारत कालीन हा संजय नेहमी सकारात्मक उपदेश प्रसारीत क रण्यासाठी ओळखला जातो.कलीयुगातील एक संजय अशाच पध्दतीने नेहमी काही ना काही कुरापती काढण्यासाठी प्रसिध्द असून त्याच्या काही रोखठोक उचापती समाज मनाला  वेदना देऊन उत्सवाचे मातेरं करण्यास कारणीभूत ठरल्याचे आजवर सिध्द झालं आहे.
खरे तर या दोन्ही संजय मध्ये केवळ नाम साध्यर्म आहे.गुणांची तूलना ञिकाल होणे शक्य नाही.त्या संजय पेक्षा आजचा संजय फारच विद्वान....कुठे काय बोलावं,कसं तोलावं ,कसं  लिहावं याचं योग्य मुल्यमापन करण्याची एक फासळी जास्तच आहे.परिणाम काय होतो त्याचा हा अतिशहाजोगपणा समाजाला बिथरण्यास ,समाज भावनांचा उद्रेक होण्यास जास्तच  प्रोत्साहन देतो.समाजमन बिथरलं की या व्यक्तीमत्वाला जरा अधिक फुरण येतं.खर तर या व्यक्तीमत्वावर अन्नदात्याने मोठी जबाबदारी टाकली आहे.सामाजिक राजकीय प्रतिष्ठा रूपी  संपत्तीत सकारात्मक वाढ व्हावी यासाठी  आपली विद्वत्ता पाजळावी अशी रास्त अपेक्षा ठेवून अन्नदाता पोसतो आहे.घडतं माञ विपरीत.या माणसानं आपली विद्वत्ता पाजळली की  समाज मन अस्वस्थ होतं आणि त्याच्या सोबत अन्नदात्याच्याही कुळाचा ऊध्दार रस्त्यारस्त्यावर केला जातो.
मागे एकदा मराठा क्रांती मोर्चाच्या ऐक्यावर भाष्य करतांना समाजाच्या संयमी भावनांवर मुका प्रहार करून या भल्या माणसानं आपल्या व्यंग बुध्दीचे नागडे प्रदर्शन केले.तेंव्हाही  समाजाने आपल्या भावना लोकशाही मार्गाने व्यक्त करून मराठी मातीचं मोठेपण कायम राखलं.
म्हणतात ना सुंभ जळाला तरी वळ माञ कायम राहतो.इथे तर वणव्यात खाक होऊन सुंभही जळाला नाही.एखाद्याचे संस्कारच इतके भ्रष्ट असतात की घाणीत चरल्याशिवाय झोप  येत नाही.या भाऊंनाही असा काही ऊद्योग केल्याशिवाय आपण लेखक आहोत याची जाणिव होत नाही.त्यातही पुज्य स्थानांवर हल्ले केले म्हणजे आपण फार मोठे लेखक झालो  आहोत अशी मनिषा आतल्या आतल्या उकयाळ्या मारते ,तिचा आनंद लुटण्यासाठी थेट महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचे आराध्य दैवतांनाच बदनामीचे संदर्भ चिकटविण्याचा प्रमाद क रतो.खरे तर या आराध्ध्य दैवतांवर पंधरा वीस ओळी लिहिण्याची पाञता आहे का?
जेंव्हा प्रकरण अंगलट येते अशी कुणकुण लागली की अमुक एका लेखकाचा संदर्भ त्यांनी दिला,ते त्यांनी लिहीले नाही अशी मल्लीनाथी करण्यासाठी एखाद्या हुजर्याला पुढे केले  जाते.अरे बाबा संदर्भ खरा की खोटा याची शहनिशा न करता जे आपलं नाही ते लिहायच कशाला?
अशा या प्रवृत्ती आणि या प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारी व्यासपीठ समाजाचे गुन्हेगार आहेत.कायद्याच्या भाषेतही गुन्हेगारच.मग त्यांच्या गोतावळ्यात हुजरेगीरी करणार्या बहुजनांनी किती  दिवस त्यांचे पाय चेपायचे हा प्रश्‍न तर आहेच पण तमाम बहुजन समाजाने या मंडळींना बहिष्कृत का करू नये.....?