Breaking News

कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत द्या - खा. खैरे

औरंगाबाद, दि. 18, ऑक्टोबर -  केंद्र, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत लाभार्थ्यांना देऊन जनतेच्या हिताला प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींना सहकार्य  करून समन्वयातून जनतेचा विकास साधा, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज अधिका-यांना केल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री.खैरे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  आमदार संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, मुख्य कार्यकारी  अधिकारी मधुकरराजे आर्दड, निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्र. प्रकल्प संचालक मंजुषा कापसे, जिल्हा परिषेदेचे सदस्य आदींची  उपस्थिती होती. खासदार चंद्रकांत खैरे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीन दयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय-ग्रामीण कौशल्य योजना,  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे  आवाहन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रशासकीय कामातील त्रूटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचनाही श्री. खैरे यांनी अधिका- यांना के ल्या. आमदार संदिपान भूमरे, आमदार प्रशांत बंब यांनीही योग्य त्या सूचना करून विहिरींची कामे पूर्ण झालेल्यांना निधी देण्यासाठी कायदेशीर मार्ग काढण्याचे संबंधितांना सांगितले.  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत तंत्रज्ञान, यंत्र सामुग्रीच्या वापराला प्राधान्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी  नवलकिशोर राम यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उद्दिष्टे वेळेत पूर्ण करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश अधिका-यांना दिले. नोव्हेंबरपर्यंत शासनाचा  योजनेवरील 60 टक्के निधीसंबंधित कामांवर खर्च होणे अपेक्षित असल्याचेही श्री. राम म्हणाले. समितीचे अध्यक्ष खासदार खैरे यांनी विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांचे पुष्पगुच्छ देऊ न स्वागत केले. त्यानंतर श्रीमती कापसे यांनी खासदार खैरे, आमदार भुमरे, आमदार बंब आदींसह मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्रीमती कापसे यांनी केले. बैठकीस  जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.