Breaking News

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी

सांगली, दि. 18, ऑक्टोबर - सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी वारूला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने  ग्रामपंचायत निवडणुकीत रोखले. विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने वाळवा तालुक्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या  गटाचे पूर्णपणे पानिपत केले, तर काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांच्यासह तालुका पातळीवरील स्थानिक नेत्यांनी  आपापले गड राखले.
सांगली जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने 424 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया  पार पडली होती. मंगळवारी सकाळी मतमोजणीस सुरूवात झाली व जसा निकाल हाती येईल, तसा गुलाल उधळत उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
सांगली जिल्ह्यातील 424 पैकी 111 ग्रामपंचायती जिंकून आजही हा जिल्हा काँग्रेस विचारांचा असल्याचे दाखवून दिले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 76 ग्रामपंचायतींवर सत्ता  हस्तगत केली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी करणार्या भाजपला यंदा ग्रामीण जनतेचे स्पष्टपणे नाकारल्याचे ग्रामपंचायत  निवडणूक निकालातून दिसून आले. भाजपला केवळ 62 ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करता आली. सांगली जिल्ह्यात एकमेव विधानसभा असलेल्या शिवसेनेच्या अनिल बाबर यांनी  खानापूर तालुक्यात 46 पैकी 22 ग्रामपंचायतींवर भगवा फडकविला.
राष्ट्रवादी काँग्रेसने वाळवा, शिराळा व तासगाव हे तीन हक्काचे तालुके राखले असले तरी जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी व कवठेमहांकाळ या तालुक्यात समाधानकारक क ामगिरी करता आली नाही. गत काही निवडणुकीत चौखूर उधळलेला भाजपच्या विजयाचा वारू ग्रामपंचायत निवडणुकीत रोखला गेला आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे 60 टक्क् याहूनही अधिक ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. केवळ मिरज, तासगाव व आटपाडी या तीन तालुक्यात भाजपचा प्रभाव दिसून आला.
सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपलीच हुकुमत असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडलेल्या फु टीचा पुरेपूर लाभ उचलत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या गटाचे पूर्णपणे पानिपत केले. या तालुक्यातील 50 पैकी तब्बल 37 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या,  तर सदाभाऊ खोत यांना मित्रपक्षांच्या मदतीने अवघ्या सहा ग्रामपंचायती राखता आल्या. शिराळा तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपले  वर्चस्व सिध्द करीत 22 ग्रामपंचायती जिंकल्या. या तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 16, तर विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव  देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला आठ ग्रामपंचायती मिळाल्या.
डॉ. पतंगराव कदम यांच्या पलूस व कडेगाव तालुक्यात काँग्रेसने चांगली कामगिरी करीत भाजपला रोखले. या दोन्ही तालुक्यात भाजपचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी  आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे 30 पैकी 20 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकविला. तासगाव तालुक्यात संजय पाटील यांनी 26 पैकी 16, तर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार श्रीमती सुमन पाटील यांनी 10 ग्रामपंचायती राखल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे गटाने 11, शिवसेनेने एक, राष्ट ्रवादी काँग्रेसने चार, काँग्रेसने तीन, तर भाजपने आठ ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन केली आहे.