Breaking News

दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांचे निधन

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांचे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात आज (मंगळवारी) सकाळी निधन झाले. संध्याकाळी सहा वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे  त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.प्रमोद मांडे हे मराठी इतिहास संशोधक होतषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि किल्ल्यांचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले  जात होते. भारतातील कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंतच्या 650 किल्ल्यांना स्वतः भेट देउन त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि क्रांतिकारकांचा सुद्धा त्यांचा  गाढा अभ्यास होता.स्वातंत्र्य संग्रामातील समिधा (चरित्रकथनात्मक), स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका (चरित्रकथनात्मक), स्वातंत्र्य संग्रामातील अंगार (चरित्रकथनात्मक), महाराष्ट ्रातील रत्नभांडार गड किल्ले महाराष्ट्राचे ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.