Breaking News

सोन्याचे दर स्थिर चांदी झाली स्वस्त

नवी दिल्ली, दि. 17, ऑक्टोबर - दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 100 रुपयांची घट होत ते  प्रतिकिलो 41,400 रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले.
राजधानी दिल्लीत चांदीचे दर 100 रुपयांनी कमी होत प्रति किलो 41,400वर पोहोचले. दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 30,850 आणि  30,700 रुपयांवर बंद झाले. याआधी शनिवारच्या सत्रात सोन्याच्या दरात 50 रुपयांची घसरण झाली होती.