Breaking News

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला नगर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद,प्रवाशांचे मोठे हाल

खासगी वाहतुक करणार्‍यांकडून प्रवाशांची अक्षरश: लूट,संपामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर -  ऐन दिवाळीच्या तोंडावरच सोमवारी रात्री पासूनच एसटीच्या कर्मचार्‍यांनी अचानक बेमुदत संप पुकारल्याने नगर जिल्ह्यात एसटीची वाहतुक  रात्रीपासूनच पूर्णपणे बंद झली.नगर जिल्ह्यातील एसटीच्या 11 डेपोंमध्ये सर्वच्या सर्व 650 बसेस जागेवरच उभ्या आहेत.संपाला एसटी कर्मचार्‍यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद  मिळाला.त्यामुळे दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.एसटीचा संप सुरू झाल्याने खासगी वाहतुक करणार्‍यांनी प्रवाशांची अक्षरश: लूट केल्याचे दिसून आले.ऐन  दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावरच एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान मंगळवारी दुपारी शहरातील तारकपूर या सर्वात मोठ्या बस  स्थानकावर अक्षरश: शुकशुकाट जाणवत होता.
विवध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी चे चालक व वाहक यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभर संप सुरू केला आहे.नगर जिल्ह्यातून दररोज धावणार्या 650 बस गाड्या  डेपोमधून बाहेरच न पडल्याने एकाच दिवसात एसटीचे जवळपास 50 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी रात्री काही प्रमाणात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थोडी वाहतुक सुरू  होती.मात्र मंगळवारी पहाटे 5.30 नंतर एकही चालक वाहक कामावर न आल्याने कोणत्याही बस स्थानकातून एसटी च्या बस बाहेर पडू शकल्या नाहीत.त्यामुळे दिवाळीसाठी  आपल्या घरी निघालेल्या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले.विशेषत: मुबई,पुणे,कोकण अशा दूरच्या ठिकाणाहूंन आपल्या घरी निघालेल्या लोकांच्या दृष्टीने एसटी चा हा संप  मोठा त्रासदायक ठरला आहे.ज्या प्रवाशांनी दिवाळी करिता घरी जाण्याच्या दृष्टीने आगावू रिझर्वेशन केले होते.त्यांचे आरक्षण रद्द करून त्यांच्या तिकिटाचे घेतलेले पैसे परत देण्यात  आले.मात्र तरी देखील प्रवासाकरिता सोय उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते.राज्यात काही ठिकाणी एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला हिंसक वळण लागले असले तरी नगर  जिल्ह्यात मात्र संप शांततेत सुरू आहे.मंगळवारी सकाळी एसटीच्या कर्मचार्‍यांनी तारकपूर बस स्थानकाच्या आवारात जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी केली.एसटी कर्मचारी  संपाच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन,आरटीओ व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संयुक्तिपणे प्रयत्न करून प्रवासांकरिता तातडीने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध क रून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या.मात्र मंगळवारी दुपारपर्यंत पर्यायी व्यवस्था होऊ शकलेली नव्हती.