’मागितले असते तर सात दिले असते , चोरून फक्त .... घेऊन गेले ’
मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - शिवसेनेने 6 नगरसेवक कोणालाही पत्ता लागू न देता आपल्या कळपात ओढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप आढळून येतो आहे . याच संतापातून मनसे कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनबाहेर मोठा फलक लावला आहे . ’ मागितले असते तर सात दिले असते , चोरून फक्त छक्के घेऊन गेले ’ असा मजकूर असलेला मोठा फलक लक्ष वेधून घेणारा ठरला आहे .
महराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे . त्याच साठी पक्ष प्रमुख राज ठाकरे हे अलीकडे चांगलेच सक्रीय झाले आहेत. फेसबुक पेज च्या माध्यमातून त्यांनी युवा मतदारांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पक्षाला उभारी देण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून एल्फिन्स्टन रॉड रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे तर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला होता . हे प्रयत्न चालू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे 7 पैकी 6 नगरसेवक फुटल्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली . नगरसेवकांचा पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिला नसल्याचे या पक्षांतरातून दिसून आले. मात्र या पक्षांतरामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता प्रचंड अस्वस्थ झाल्याचे दिसून येते आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांकडून फलकबाजी चालू झाली आहे. समाज माध्यमांवरही मनसे कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून पक्षाबाहेर पडलेल्या नगरसेवकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे .