उद्धवच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळूनच शिवसेना सोडली - राज ठाकरे
मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - उद्धव ठाकरेंच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळूनच मी शिवसेनेतून बाहेर पडलो . आता उद्धव ठाकरेंनी त्याच नीच , गलिच्छ राजकारणाचा पुढचा डाव खेळला आहे . या डावाला आपण जशास तसे उत्तर देऊ , असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला .
मनसे च्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला आहे . मनसे नगरसेवकांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे पक्षांतर मनसे च्या चांगलेच जिव्हारी लागले आहे . शिवसेनेचा निषेध करणारे फलक मनसे तर्फे मुंबईत लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली . ते म्हणाले की, आमचे 6 नगरसेवक फोडून शिवसेनेने नीच राजकारण केले आहे . आम्ही हे राजकारण कधीच विसरणार नाही .
ते पुढे म्हणाले की , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अशा पद्धतीचे फोडाफोडीचे राजकारण कधीच पसंत नव्हते. उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीचे राजकारण खेळण्याची सवय आहे . त्याला कंटाळूनच मी शिवसेनेतून बाहेर पडलो .
या घाणेरड्या राजकारणाला आपण त्याच पद्धतीने उत्तर देऊ .त्यांचा हा नीचपणा आम्ही विसरलो नाही हे ’त्यांना ’ भविष्यात नक्कीच कळेल , असेही राज म्हणाले . ते पुढे म्हणाले की , जे नगरसेवक बाहेरव पडलेत त्यांच्याविषयी अनेक दिवसांपासून कुजबुज चालू होती . म्हणून या नगरसेवकांना मी समक्ष विचारले होते . पण ज्यांना बाजारात स्वत:ला विक ायचेच आहे त्याच्याविषयी आपण काय बोलणार ? शिवसेनेनं मदत मागितली तर नक्की दिली असती आता मात्र त्यांना गालावर टाळी मिळेल , असेही ते म्हणाले .