Breaking News

हार्बर मार्गावरील रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; वाहतूक उशिराने

मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - हार्बर मार्गावरील रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे मात्र या मार्गावरील गाड्या अद्यापही उशिराने धावत आहेत. गोवंडी स्थानकाजवळ छत्रपती  शिवाजी महाराज टर्मीनसकडे येणार्‍या मार्गावर आज सकाळी सातच्या सुमारास रेल्वे रुळाला रुळाला तडे गेले होते. यानंतर अप मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मात्र  याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि वाहतूक सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत वाहतूक सुरु झाली असली तरी काहीकाळासाठी क ामानिमित्त सकाळी लवकर घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा चांगलाच खोळंबा झाला.