ध्वनी व वायू प्रदूषण होऊ देऊ नका -महापौर मिनाक्षी शिंदे
ठाणे, दि. 16, ऑक्टोबर - दीपावली सण साजरा करीत असताना ध्वनी व वायू प्रदूषण होऊ नये या करीता ठाणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधीनी आपआपल्या प्रभागात व्यापक स्वरुपात जणजागृती करावी. तसेच नागरिकांनी देखील आवाज विरहीत फटाके फोडावेत करावी असे आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केले आहे.
ठाणेकरांना दीपावलीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात महापौरांनी हे आवाहन केले आहे.दीपावली निमित्त विविध प्रकारचे फटाके वाजवून आपण हा सण साजरा करतो. परंतू हे करीत असताना अबालवृध्दांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने सजग राहणे महत्वाचे व अनिवार्य आहे. मोठया आवाजाचे फटाके वाजविल्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा व वायुप्रदूषणाचा त्रास होऊ शकतो, याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे. परिसरात रुग्णालय असल्यास फटाक्यांच्या आवाजाचा व वासाचा त्रास लहान मुले व वृध्दांना होऊ नये यासाठी आवाज विरहित फटाके लावून दिपावली साजरी करावी. ध्वनी व वायू प्रदूषण होऊ नये या करिता केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यांच्या या प्रयत्नात आपण ठाणेक रांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असेही महापौरांनी आपल्या संदेशात म्हटले आहे .