Breaking News

दीपावलीनिमित्त आदिवासी विभागातील शेकडो कुटुंबाना मोफत कपडे वाटप

ठाणे, दि. 16, ऑक्टोबर - ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठांन या संस्थेमार्फत राज्यातील परिसरामध्ये फिफा वर्ल्डकप निमित्त जनजागृती करत असताना, काही भागात अजूनही आ दिवासी कुटुंबातील मुलांना पुरेसे कपडे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना एक हात मदतीचा असे आव्हाहन करण्यात आले होते, त्यानुसार पालघर जिल्हा येथील दोंडे  पाडा, सुपे पाडा येथे दीपावली निमित्त कपड्यांचे वाटप करण्यात आले. 
दीपावली निमित्त आपण आपल्या घरी नवनवीन कपडे घेऊन नवीन वस्तूंची खरेदी करतो. त्या प्रमाणे दीपावली साजरी करतो. परंतु अजूनही काही भागात आदिवासी कुटुंबाणा  त्यांच्या अंगावर कपडे नाहीत असे दिसून आल्यावर त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने नागरिकांना मदतीचे आव्हान करण्यात आले  होते. त्यानुसार संपूर्ण राज्यातून नागरिकांनी मदतीचा हात फुडे केला होता.
त्यामध्ये मनोहर चव्हाण, कमलेश ढवळे, अनघा सुर्वे, ओंकार, सुशांत सूर्यराव, अरुण कदम, अरविंद उतेकर, संजोग शिळकर, योगेश गवारी, हर्षल चव्हाण, योगेश आमले, नैना  भोईर, प्राची चौधरी, कविता कदम, सीताराम राणे, आर्या कदम, गणेश साखोरे, प्रज्ञा जाधव आदी नागरिकांनी कपड्यांची मदत करून सहकार्य केले.
त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अमित कदम, सचिव रोशन कदम, खजिनदार सुरज कदम, सदस्य रोहित शिगवण यांनी ही कपड्यांची  मदत आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचविण्याकरिता आदिवासी विभागाचा शोध घेत ती मदत आदिवासी कुटुंबाना रविवारी दीपावली पूर्वी पोहोचविली. त्यावेळी आदिवासी कुटुंबांच्या  चेहर्‍यावरचे हास्य खूप आनंददायी होते.
यावेळी पालघर जिल्ह्यातील दोंडे पाडा, सुपे पाडा या विभागातील कुटुंबाना नवीन तसेच जुने कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राहुल कदम, रोहिदास मोक ाशी, राम देशमुख, प्रविन देशमुख, संकेत ठाकरे, विशाल मोकाशी, राजेंद्र मोकाशी, मंदा ताई यांनी विशेष मेहनत घेतली.