Breaking News

नवी मुंबईतील उभ्या असलेल्या बसेसला आग

नवी मुंबई, दि. 16, आक्टोबर - नवी मुंबईतील करावे गावाजवळील उभ्या असलेल्या 7 स्कूल बसना आग लागली होती. पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक एका बसमध्ये  स्फोट झाल्याने आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत एक-एक करत एकत्र उभ्या असलेल्या 7 स्कूल बस जाळून खाक झाल्या.  बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने  ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच आग विझवल्याने करावे गावापर्यंत पोहचली नाही. या सर्व बस ज्ञानदीप शाळेच्या आहेत.