Breaking News

ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. 02, ऑक्टोबर - कांदिवली येथे दारू पिऊन गाडी चालवणा-या एका पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश  सानप असे या पोलीस कर्मचा-याचे नाव असून ते कांदिवली येथील पश्‍चिम द्रुतगती मार्गावर साईधाम मंदिराजवळ बोरिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात कार्यरत  आहेत. 
एमएचबी पोलीस ठाण्यात सानप यांच्या विरोधात ड्रंक अँड ड्राईव्हची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सानप यांच्या विरोधात कलम 185 आणि  मोटर वाहन कायदा 85-1 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सानप गाडी चालवत असताना रस्त्यावरून चालत असलेले सर्वसामान्य नागरिक सुदैवाने बचावले  आहेत.