Breaking News

महात्मा फुले पुतळ्यासमोर तरुणांच्या जाहीरनाम्याचे वाचन

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - माळीवाडा वेशिजवल महात्मा फुले पुतळ्यासमोर महाराष्ट्रातील विविध भागातील तरुणांनी तयार केलेल्या जाहिरनाम्याचे वाचन करण्यात आले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील दाक्षिणायन ग्रुप च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालये, युवक संघटना तसेच साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 
प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमास प्रारंभ झाला. रेडिओ जॉकी तेजश्री फुलसौंदर यांनी तरुणांच्या जाहिरनाम्याचे वाचन केले.
 कलेतून  प्रेम  व्यक्त  करणे, सलोखा तत्वांशी तडजोड न करणे व तरुणांनी अभिव्यक्त होऊन मुक्त व्हावे, असे आवाहन तरुणाईच्या प्रतिनिधी म्हणून निमिषा बंडेलू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अतुल महानोर यांनी विद्यार्थी व युवकांचे ज्वलंत प्रश्‍न मांडले. आम्ही सतत तरुणांबरोबर आहोत. यापुढील काळात दक्षिणायन चे अभियान तरुणांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर नेऊ असे प्रा. खासेराव शितोळे यांनी यावेळी जाहीर केले.